केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर शस्त्रक्रिया; नितेश राणे यांनी घेतली भेट
पुणे : केंद्रीय राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर आण्णा मोहोळ यांच्यावर काही वर्षांपूर्वी झालेल्या दुखापतीवर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सिंधुदुर्गचे पालकमंत्री आमदार नितेश राणे यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
या भेटीदरम्यान नितेश राणे यांनी मोहोळ यांच्या प्रकृतीची माहिती घेत त्यांना धीर दिला. तसेच या कठीण काळातून ते लवकर सावरून पूर्णपणे ठणठणीत बरे व्हावेत आणि पुन्हा नव्या जोमाने जनतेच्या सेवेसाठी कार्यरत व्हावेत, अशा सदिच्छाही व्यक्त केल्या.
दरम्यान, शस्त्रक्रियेनंतर मोहोळ यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत असून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


