कणकवली – कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे मुंबई येथील स्पाईन फउंडेशन(डॉ शेखर भोजराज सर ) यांच्यातर्फे मणक्याचा आजारावर शिबीर दिनांक 23 मार्च 2024 रोजी दुपारी 12 वाजता आयोजित केलेले आहे. या शिबिरात मुंबई येथील जेष्ठ स्पाईन सर्जन डॉ. भोजराज सर व त्यांची पूर्ण टीम येणार आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-महा-रक्तदान-शिबीराचे-आयो/
डॉ भोजराज सर हे 23 मार्च रोजी उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे भेट देणार असून या भेटीमध्ये पेशंट तपासणी, उपचार व सल्ला देणार आहेत . तसेच उपजिल्हा रुग्णालय येथील उपलब्ध मनुष्यबळ व साधनांची माहिती घेणार असून पुढील भेटी पासून माणक्याची ऑपरेशन कणकवली उप जिल्हा रुग्णालयात चालू करण्याचा मानस आहे. ते सध्या कोल्हापूर , अंबेजोगाई, गडचिरोली येथे जाऊन विनामूल्य मणक्याच्या आजारावर ऑपेरेशन करत आहेत.
तरी आपल्याला माहित असलेले मणक्याचा त्रास असलेल्या रुग्णांना 23 मार्च रोजी उपजिल्हा रुग्णालय येथे दुपारी 12 वाजता येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच येताना आधी केलेले x- रे व MRI रिपोर्ट घेऊन यावे. शिबिराच्या वेळी सिविल सर्जन डॉ श्रीपाद पाटील सर हे देखील उपस्थित असणार आहेत.
टीप :
ज्या रुग्णांना मणक्याचा आजार असेल व लोकल डॉक्टर ना दाखवून बरे होत नसेल किंवा सिरीयस मणक्याचा त्रास जसे कि मणक्याचा TB, मणक्याचे फ्रॅक्चर, पायाची नस दबणे, मणक्याकतून पायाकडे कळ जाणे, मणक्याची झीज झालेली असणे अशा रुग्णांना तपासण्यात येईल. इतर सांधे दुःखीच्या पेशंट नी शिबिरासाठी येऊ नये.