Kokan: बांद्यात ओल्या कचऱ्यासाठी कचराकुंड्यांचे वाटप

0
87
बांदा ग्रामपंचातीचा गोबर्धन प्रकल्प
बांद्यात ओल्या कचऱ्यासाठी कचराकुंड्यांचे वाटप


सुनिता भाईप / ( सावंतवाडी)
बांदा : ओल्या कचऱ्यावर प्रक्रीया करण्यासाठी बांदा ग्रामपंचातीचा गोबर्धन हा प्रकल्प पुर्णत्वास येत आहे.हा प्रकल्प व्यवस्थितरित्या चालण्यासाठी सुका कचरा व ओला कचरा वेगवेगऴा असणे आवश्यक आहे.त्यामुळे ओला कचरा स्वतंत्रपणे वेगळा संकलित  करण्यासाठी बांदा ग्रामपंचायतीच्या वतीने बांदा ग्रामस्थांना घरोघरी कचराकुंड्यांचे वाटप करण्यास आरंभ करण्यात आला  आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-काळेथर-बेकायदेशीर-उत्खन/

बुधवारी बांदा उभाबाजारसह अन्य भागात हे वाटप करण्यात आले.प्रत्येक वॉर्डमध्ये या कचराकुंड्या देण्यात येणार आहेत. यावेऴी पत्रकाद्वारे तसेच स्पिकरद्वारे सुचित करण्यात आले की सर्व ग्रामस्थ,मच्छी विक्रेते,पोल्ट्री तसेच हॉटेल व्यवसायिक,भाजीपाला विक्रेते यांनी 14 मार्चपासुन ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा संकलित करुन ठेवावा अन्यथा सफाई कर्मचाऱ्यांकडून तो घेतला जाणार नाही.सर्वांनी हे वर्गीकरण करुन बांदा ग्रामपंचायतीस गोबर्धन प्रकल्प चालवीण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन बांदा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच प्रियांका नाईक व उपसरपंच बाळू सावंत यांनी केले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य रिया  येडवे,  श्रेया केसरकर,ग्राम विस्तार अधिकारी लिला मोर्ये, शैलेश केसरकर  तसेच ग्रामपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here