Kokan: ग्रामसेवक बांधकाम कामगारांना १० दिवसांचा दाखला देण्यास जाणून बुजून करीत आहेत टाळाटाळ -रूपेश पावसकर

0
79
बांधकाम कामगार,ग्रामसेवक ,
ग्रामसेवक बांधकाम कामगारांना १० दिवसांचा दाखला देण्यास जाणून बुजून करीत आहेत टाळाटाळ -रूपेश पावसकर

रोजंदारी बुडवून कामगार दाखल्यासाठी ग्रामपंचायतीत घालत आहेत हेलपाटे

कुडाळ- मा.मुख्यकार्यकारी अधिकारी,जि.प.सिंधुदुर्ग यांनी सिंजिप/ग्राप/कार्ता-६४६९१/२०२४ दि.०५/०२/२०२४. पत्र गटविकास अधिकारी व ग्रामसेवक संघटना अध्यक्ष यांना आदेशपत्र पाठवून सुचित केले असतानांही सिंधुदुर्ग जिल्हातील काही ग्रामसेवक बांधकाम कामगार यांना १० दिवसांचा दाखला देण्यास जाणून बुजून टाळाटाळ करीत आहेत. तसेच दाखल्यासाठी ग्रामसेवक हजर असूनही थातूर मातूर कारण दाखवून नकारात्म प्रश्नांची विचारणा करून, नंतर या असे सांगुन कामगारांना रोजंदारी बूडवून हेलपाटे मारण्यास भाग पाडत असल्याचे आमच्या निदर्शनास येत आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-बांद्यात-ओल्या-कचऱ्यासा/

तरी याबाबत आपल्या स्तरावरून गटविकास अधिकारी,तसेच ग्रामसेवक यांना सूचना देण्यात याव्या अशी विनंती मा.मुख्य कार्यकारी अधिकारी ,जि.प.सिंधुदुर्ग यांजकडे शिवसेना जिल्हा संघटक श्री रूपेश पावसकर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here