Koan: कंपोष्ट डेपोतील शेती उत्पादने आकर्षण

0
65
कंपोष्ट डेपो,
कंपोष्ट डेपोतील शेती उत्पादने आकर्षण

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला नगरपरिषद कंपोस्ट डेपोमध्ये आगळ्या वेगळ्या संकल्पना राबविण्यात अग्रेसर असते. त्याचाच एक भाग म्हणून त्याठिकाणी केलेल्या शेतीतून घेण्यात आलेले उत्पादन पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-महाफिडतर्फे-संगणक-व-प्/

      कच-याचे साम्राज्य असलेला कंपोस्ट डेपो फळाफुलांनी बहरला आहे. या ठिकाणी लाल भाजीमकाभेंडी आदी भाजीपाला तसेच सूर्यफूलझेंडू या सारख्या फुलझाडांची तर जामपेरूपपई व चिकू आदी फळ झाडांचीही लागवड करण्यात आली आहे. येथे काम करणारे नगरपरिषदेचे स्वच्छता कर्मचारी या झाडांच्या जतन व संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. वेंगुर्ला नगरपरिषद स्वच्छतेकडून समृद्धीकडे वाटचाल करत असल्याचे मत मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी व्यक्त केले.

फोटोओळी – कंपोष्ट डेपोत शेती करून विविध प्रकारची उत्पादने घेण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here