ट्रान्सजेंडर विधेयक २०२६ ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तीव्र निषेध

0
45
ट्रान्सजेंडर विधेयक २०२६ ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तीव्र निषेध
ट्रान्सजेंडर विधेयक २०२६ ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तीव्र निषेध

ट्रान्सजेंडर विधेयक २०२६ ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तीव्र निषेध

मुंबई : ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या अधिकारांवर गदा आणणाऱ्या **‘तृतीयपंथीय व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) दुरुस्ती विधेयक २०२६’**चा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या LGBTQ+ सेलने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. हे विधेयक सर्वोच्च न्यायालयाच्या NALSA (२०१४) निर्णयाच्या भावनेविरोधात असून ट्रान्सजेंडर समुदायाच्या सन्मान, अस्तित्व आणि संविधानिक अधिकारांवर थेट आघात करणारे असल्याचा आरोप सेलने केला आहे.

पक्षाच्या LGBTQ+ सेलने जारी केलेल्या निवेदनात, हे विधेयक तयार करताना ट्रान्सजेंडर समुदायातील कोणत्याही घटकाला विश्वासात घेण्यात आले नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच राष्ट्रीय ट्रान्सजेंडर परिषद अपयशी ठरल्याचा आरोप करत परिषदेमधील सर्व सदस्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणीही करण्यात आली आहे.

हे विधेयक तात्काळ मागे घ्यावे, तसेच भविष्यात LGBTQ+ समुदायाच्या घटनात्मक अधिकारांच्या संरक्षणासाठी लढा कायम राहील, अशी भूमिका या निवेदनातून स्पष्ट करण्यात आली. या आशयाचे अधिकृत प्रसिद्धीपत्रक पक्षाच्या LGBTQ+ सेलच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सुपूर्द केले.

यावेळी LGBTQ+ सेलच्या महाराष्ट्र राज्यप्रमुख प्रिया पाटील, राष्ट्रीय प्रवक्ते अनिश गवांदे, तसेच LGBTQ+ समुदायातील टॅन, रुद्राणी आणि आदित्य हे प्रतिनिधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here