⭐सिंधुरत्न योजनेतील प्रस्ताव सादर करण्याची अल्प मुदत निलेश राणे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून दिली होती वाढवून
प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर
मालवण :- सिंधुरत्न योजनेतून मच्छीमारांच्या आर्थिक विकासाचे प्रस्ताव सादर करण्यासाठी देण्यात आलेली अल्प मुदत वाढवून देण्यात महत्वाची भूमिका बजावणारे भाजप नेते निलेश राणे यांची मालवण येथील ट्रॉलर मालक यांनी भेट घेऊन आभार व्यक्त केले आहेत. https://sindhudurgsamachar.in/kokan-मुंबई-गोवा-महामार्गावर-भ/
यावेळी विकी चोपडेकर, नितिन आंबेरकर, आबू आड़कर, मनीष खड़पकर, वासुदेव आजगांवकर, सेलेस्तीन फर्नीन्डिस, पंकज सादये या सर्वांनी नीलेश राणे यांची त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून निलरत्न निवासस्थानी भेट घेत आभार व्यक्त केले आहेत.
सिंधुरत्न योजनेतून मच्छीमारांच्या आर्थिक विकासाचे प्रस्ताव सादर करण्यासाठी देण्यात आलेली मुदत अल्प असल्याने त्याचा फटका सर्वसामान्य मच्छीमारांना बसणार असल्याच्या प्रश्नांवर माजी खासदार नीलेश राणे यांचे मच्छीमार सोसायट्यांनी लक्ष वेधले होते. राणे यांनी याबाबत तातडीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली असता, दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याने त्याचा फायदा जिल्ह्यातील मच्छीमारांना झाला. यामुळे मच्छीमारांच्या वतीने पालकमंत्री चव्हाण आणि राणेंचे आभार मानण्यात आले आहेत.