मुंबईत जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन; २७-२८ मार्चला दादरमध्ये पुस्तकांचा मेळा

0
15

मुंबई : मुंबई शहराचा जिल्हा ग्रंथोत्सव येत्या २७ व २८ मार्च २०२६ रोजी दादर (पूर्व) येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय येथे आयोजित करण्यात आला आहे. या ग्रंथोत्सवानिमित्त विविध साहित्यिक, सांस्कृतिक आणि वाचनविषयक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे.

ग्रंथोत्सवाची सुरुवात २७ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता शालेय विद्यार्थ्यांच्या ग्रंथदिंडीने होणार आहे. त्यानंतर सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या वेळेत मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ पार पडणार आहे.

दोन दिवस चालणाऱ्या या ग्रंथोत्सवात शासकीय प्रकाशनांसह विविध खासगी प्रकाशक आणि विक्रेत्यांची विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध असणार आहेत. साहित्यप्रेमींसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे.

मुंबई शहराचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशिकांत काकड यांनी मुंबईकर नागरिक, विद्यार्थी, ग्रंथप्रेमी आणि साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ग्रंथोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here