“राजमाता जिजाऊ” स्मार्ट बस सेवेचे भव्य लोकार्पण; एसटीच्या आधुनिकीकरणाला नवे पंख

0
31
“राजमाता जिजाऊ” स्मार्ट बस सेवेचे भव्य लोकार्पण; एसटीच्या आधुनिकीकरणाला नवे पंख
“राजमाता जिजाऊ” स्मार्ट बस सेवेचे भव्य लोकार्पण; एसटीच्या आधुनिकीकरणाला नवे पंख

“राजमाता जिजाऊ” स्मार्ट बस सेवेचे भव्य लोकार्पण; एसटीच्या आधुनिकीकरणाला नवे पंख

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) च्या “राजमाता जिजाऊ” या अत्याधुनिक स्मार्ट बस सेवेचे भव्य लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील विधानभवन प्रांगणात उत्साहात पार पडले. या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेला आधुनिकतेची जोड मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवर, अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

“राजमाता जिजाऊ” या नावातून मातृत्व, संस्कार आणि स्वराज्याची प्रेरणा जागवण्याचा प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले. राजमाता जिजाबाई यांच्या कार्याला अभिवादन म्हणून ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या सुमारे ३००० बसेस टप्प्याटप्प्याने राज्यभर धावणार असून, प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि विश्वासार्ह प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. शिवनेरी, शिवशाही, शिवाई, हिरकणी आणि यशवंती या सेवांच्या परंपरेत “राजमाता जिजाऊ” ही नवी भर ठरणार आहे.

लोकार्पणानंतर मुख्यमंत्री आणि अन्य मान्यवरांनी बसमधून प्रत्यक्ष प्रवास करत नव्या सेवेचा अनुभव घेतला. या बस सेवेच्या माध्यमातून केवळ प्रवास सुलभ होणार नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि प्रेरणादायी इतिहासाचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचेही अधोरेखित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here