नैसर्गिक शेतीसाठी मार्गदर्शक कार्यशाळा; दापोलीत शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी

0
25

दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत महत्त्वपूर्ण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शेतीत बदल घडवून आणण्यासाठी ही कार्यशाळा शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

या कार्यशाळेचे विशेष आकर्षण म्हणजे गोपालभाई सुतारिया यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन. बंसी गिर गोशाळेचे संस्थापक असलेल्या सुतारियाजी त्यांच्या अनुभवातून नैसर्गिक शेतीबाबत उपयुक्त माहिती आणि मार्गदर्शन देणार आहेत. त्यांचा अनुभव शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य असून, गुगल फॉर्मद्वारे नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नोंदणी लिंक : https://forms.gle/TcZkVLB7ocrutLK1A

शेतीत नवे प्रयोग, खर्चात बचत आणि उत्पादनात वाढ यासाठी ही कार्यशाळा महत्त्वाची संधी असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, तसेच इतर शेतकऱ्यांनाही सहभागी करून घ्यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here