राजन काजरोळकर यांना ‘राज्यस्तरीय कलारत्न’ पुरस्काराने गौरव

0
56
राजन काजरोळकर यांना ‘राज्यस्तरीय कलारत्न’ पुरस्काराने गौरव
राजन काजरोळकर यांना ‘राज्यस्तरीय कलारत्न’ पुरस्काराने गौरव

राजन काजरोळकर यांना ‘राज्यस्तरीय कलारत्न’ पुरस्काराने गौरव

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत ज्येष्ठ रंगकर्मी राजन काजरोळकर यांना यंदाचा “राज्यस्तरीय कलारत्न” पुरस्कार प्रदान करण्यात आला. सोमवार, दि. २३ मार्च २०२६ रोजी डॉ. मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे मान्यवरांच्या उपस्थितीत तेजस बहुउद्देशीय सामाजिक संस्थातर्फे हा सन्मान करण्यात आला.

पुरस्कार स्वीकारताना राजन काजरोळकर यांनी भावना व्यक्त करत सांगितले की, “माझ्या अनेक वर्षांच्या मेहनतीला आज फळ मिळाल्याचा खूप आनंद आहे. यापुढेही अधिक चांगले काम करण्यासाठी हा सन्मान प्रेरणादायी ठरेल.” तसेच त्यांनी तेजस संस्थेच्या निवड समितीचे मनापासून आभार मानले.

राजन काजरोळकर यांची अभिनयाची आवड शालेय जीवनापासूनच जोपासली गेली. अवघ्या ९ व्या वर्षी कुमार कला केंद्र आयोजित आंतरशालेय नाट्यस्पर्धेत त्यांनी अभिनयासाठी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले आणि त्यानंतर त्यांच्या नाट्यप्रवासाला खरी दिशा मिळाली.

आजवर त्यांनी मराठी व हिंदी नाटकं, लघुपट, वेब सिरीज, जाहिरात चित्रपट, म्युझिक अल्बम तसेच मराठी मालिकांमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या त्यांच्या “संधिकाली या अशा” या विनीता पिंपळखरे लिखित व दिग्दर्शित एकपात्री बहुरूपी प्रयोगाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, पहिल्याच प्रयोगानंतर विविध ठिकाणांहून निमंत्रणे येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

राजन काजरोळकर यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

प्रयोगासाठी संपर्क : ९८२०९२३८९७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here