देश-विदेश : मुख्यमंत्रीपदावर असताना अटक होणारे केजरीवाल स्वतंत्र भारताचे पहिले मुख्यमंत्री

0
59
केजरीवाल,
मुख्यमंत्रीपदावर असताना अटक होणारे केजरीवाल स्वतंत्र भारताचे पहिले मुख्यमंत्री

नवी दिल्ली- काल रात्री प्रवर्तन निदेशालय यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावर असताना अटक केली. मात्र या अटकेमुळे मुख्यमंत्री पदावर असताना अटक झालेले ते पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.यापूर्वी देखील अटक झाल्याची उदाहरणे आहेत. परंतु या सर्व मुख्यमंत्र्यांनी अटक होण्यापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला यापूर्वी 31 जानेवारी, 2024 रोजी हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली आहे परंतु त्यापूर्वीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-गेल्या-६०-वर्षांत-नव्हत/

याआधी 30 जुलै 1996 रोजी लालूप्रसाद यादव सन 2004 मध्ये उमा भारती सन 1996 मध्ये जय ललिता तसेच चंद्राबाबू नायडू ,ओम प्रकाश चौथाला, बी एस येडियुरप्पा अशा मुख्यमंत्र्यांना विविध कारणांसाठी अटक झाली आहे. परंतु या सर्वांनी अटक होण्यापूर्वीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. भारतातील कायद्यानुसार म्हणजेच नागरी प्रक्रिया संहिता 135 अन्वये मुख्यमंत्र्यांना केवळ दिवाणी प्रकरणांमध्ये संरक्षण देण्यात आले आहे तसेच विधानसभेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी चाळीस दिवस आणि संपल्यानंतर 40 दिवस पर्यंत मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात येऊ शकत नाही.
एकूणच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या नावासोबत जोडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here