यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशस्विनी सन्मान पुरस्कार २०२६’ जाहीर
अर्जाची अंतिम तारीख १५ एप्रिल
मुंबई : स्त्रीशक्तीला प्रोत्साहन आणि गौरव देण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर (Yashwantrao Chavan Centre)च्या वतीने ‘यशस्विनी सन्मान पुरस्कार २०२६’ जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराची संकल्पना खासदार सुप्रियाताई सुळे(Supriya Sule)यांच्या पुढाकारातून राबविण्यात आली आहे.
या वर्षी या पुरस्काराचे पाचवे वर्ष असून विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. कृषी, साहित्य, सामाजिक कार्य, क्रीडा प्रशिक्षण, उद्योग आणि पत्रकारिता या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा या पुरस्काराद्वारे सन्मान करण्यात येणार आहे.
इच्छुक महिलांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ एप्रिल २०२६ निश्चित करण्यात आली आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांना व्यासपीठ मिळणार असून, त्यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळणार आहे.


