राज्यातील करोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत आहे.राज्यातील निर्बंध हळूहळू उठवले जात आहेत. देशाचे अर्थचक्रही गती घेण्याच्या पर्यटनात आहे.पण या सर्वामध्ये नागरिकांनी थोडे संयमाने वागणे जरुरीचे आहे.कारण सध्या रस्त्यावर झालेली गर्दी बघता पुन्हा एकदा कोरोनाचे संक्रमण वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
दुसऱ्या लाटेतून सावरता सावरता राज्याला लवकरच तिसऱ्या लाटेलाही सामोरे जावे लागू शकते, असा इशारा बुधवारी करोना नियंत्रणासाठीच्या तज्ज्ञांच्या कृती गटाने दिला. नागरिकांनी नियमांचे पालन कठोरपणे पाळावे असे त्यांनी सांगितले आहे.मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या कृती गटातील तज्ज्ञांशी चर्चा केली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, डॉ रामास्वामी, डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ राहुल पंडित, डॉ तात्याराव लहाने आदी उपस्थित होते.
इंग्लडसहअन्य देशांत पुन्हा कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू लागला आहे .त्यामुळे त्यांना निर्बंध लावण्याची वेळ आली आहे असे सांगत कृती गटाने मुख्यमंत्र्यांचे लक्ष राज्याच्या कोरोना संक्रमणाच्या येणाऱ्या तिसऱ्या लाटेकडे वेधले आहे वेधले. ही संभाव्य लाट रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी मुख्यमंत्र्यांनी दिल्या. तसेच कोररोनाच्या निर्बंधांचे पालन काटेकोरपणे करणे गरजेचे असल्याचेहि त्यांनी सांगितले. त्याशिवाय जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याच्या उपाययोजना काणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.