भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (SAI)मध्ये ३२३ सहाय्यक प्रशिक्षक पदांसाठी भरती

0
25

२१ एप्रिलपर्यंत अर्ज

नवी दिल्ली : Sports Authority of India (SAI) ने विविध क्रीडा प्रकारांमध्ये ‘सहाय्यक प्रशिक्षक’ (Assistant Coach) पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण ३२३ पदे नियमित तत्त्वावर ‘लेव्हल-६’ वेतनश्रेणीत भरली जाणार आहेत.

ही पदे देशभरातील विविध प्रादेशिक केंद्रे, राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रे (National Centres of Excellence) तसेच प्रशिक्षण केंद्रांवर नियुक्त करण्यात येणार आहेत. त्यामुळे क्रीडा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे.

या भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया २३ मार्च २०२६ पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ एप्रिल २०२६ निश्चित करण्यात आली आहे.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. त्यामध्ये वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अनुभव, आरक्षण आणि निवड प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here