दोडामार्ग- सांगेली गावचे ग्रामदैवत श्री देव गिरीजानाथ मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा अर्थात गिरोबा उत्सव सांगेली येथे संपन्न झाला. त्यामुळे पूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते त्या त्या निमित्त श्रीदेव गिरोबाचे अर्चनाताई घारेपरब यांनी देवाचे दर्शन घेतले. https://sindhudurgsamachar.in/kokan-फणसाच्या-झाडाला-ग्रामदै/
सांगेली गावात महाशीवरात्रीला फणसाचं झाड देव म्हणून निवडलं जातं. होळीला हे झाडं तोडून विशिष्ट गोलाकार आकार देऊन त्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते आणि मध्यरात्री विधीवत प्राणप्रतिष्ठापणा करून पूजल जातं. सांगेली गावचं ग्रामदैवत फणसाचं झाड असलेले हे देशातील एकमेव मंदिर आहे. कोकणात इतर मंदिरात दगडी पाषण असत मात्र सांगेली गावात मात्र फणसाच्या झाडापासून शिवलिंगाच्या आकाराचा पाषण बनवलं जातं.
कोकणात शिमगोत्सवाचा हा अनोखा थाट पहायचा असेल तर सांगेलीत गेलंचं पाहिजे. गिरोबाचे पाषाण हे फणसाच्या खोडातून तयार होते. यामुळे सांगेलीतील ग्रामस्थ फणसाच्या झाडाला देव मानतात. दरवर्षी या देवाची प्रतिष्ठापना होते. गावात फणसाच्या झाडावर होळीव्यतिरिक्त कधीही शस्त्र चालवले जात नाही. या उत्सवात जिल्हावासीयांबरोबर गोवा, कर्नाटक भागातूनही भाविक दरवर्षी मोठ्या संख्येनं दाखल होत असतात. त्यामुळे कोकणातील शिमगोत्सवाला पर्यटनाच्या दृष्टीनं विचार करून प्रचार केल्यास रोजगार निर्मितीला मोठा वाव आहे.