राष्ट्रीय तायक्वांदो पंच परीक्षेत सिंधुदुर्गच्या खेळाडूंचे यश; जिल्ह्याचा गौरव

0
39

कणकवली (प्रतिनिधी):
Taekwondo Federation of India च्या मान्यतेने Taekwondo Association of Maharashtra आणि रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय तायक्वांदो पंच परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणाल नारकर आणि सोनिया ढेकणे यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तर राज्य पंच परीक्षेत तनिष्का सावंत व श्रीनिधी सावंत यांनीही यश मिळवले.

ही परीक्षा रत्नागिरी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात पार पडली. या परीक्षेत खेळातील तांत्रिक कौशल्य, शारीरिक क्षमता तसेच आत्मसंरक्षणाच्या विविध अंगांची कसोटी पाहण्यात येते, त्यामुळे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

या यशासाठी मास्टर स्पोर्ट्स तायक्वांदो अँड फिटनेस अकॅडमीचे राष्ट्रीय प्रशिक्षक व पंच एकनाथ धनवटे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत यश मिळवले.

या यशाबद्दल तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गचे अध्यक्ष संदेश पारकर तसेच पदाधिकारी भालचंद्र कुलकर्णी, सुधीर राणे, विनायक सापळे आणि अमित जोशी यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here