⭐ उबाठा’सेनेचे प्रमुख उध्दव ठाकरे हे कणकवलीच्या मैदानात मोठी सभा घेणार ⭐२ ९ मार्चपासून गावभेट दौर्याला सुरुवात
सिंधुदुर्ग-(समाचार न्यूजनेटवर्क)- : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना ‘उबाठा’चे खा. विनायक राऊत तिसर्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी ‘उबाठा’चे प्रमुख उध्दव ठाकरे हे कणकवलीच्या मैदानात मोठी सभा घेणार आहेत. कोकणातील जनता शिवसेना उबाठा आणि महाविकास आघाडीच्या पाठीशी असून २९ मार्चपासून गावभेट दौर्याला सुरुवात करणार असल्याचे खा. विनायक राऊत यांनी सांगितले. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-राज्यातील-लोकसभेच्या-४/
रत्नागिरीत मालगुंड येथे शिमगोत्सवानिमित्ताने आलेल्या खा. विनायक राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार सुभाष बने, जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, लोकसभा मतदार संघापैकी सिंधुदुर्गमधील महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांशी बैठका पार पडल्या असून येत्या २८ मार्चला रत्नागिरीतील महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांशी चर्चा करणार आहे. राष्ट्रवादी, आप आणि कॉंग्रेस पदाधिकार्यांशी बैठका होणार आहेत. त्यानंतर २९ मार्चपासून आपण जिल्हा परिषद निहाय बैठका व गावभेट कार्यक्रमाला सुरुवात करणार असल्याचे खा. विनायक राऊत यांनी सांगितले. २९ मार्च ते ११ एप्रिल असा लोकसभा मतदार संघाचा दौरा करणार असून प्रत्येक दिवशी १० ते १२ गावांना भेटी देणार असल्याचेही खा. राऊत यांनी सांगितले. त्यानंतर १६ एप्रिलला आपण उमेदवारी अर्ज भरणार असून, रामनवमीनंतर शहरी भागांसह जिल्हा परिषद गटनिहाय दौरे करणार असल्याचे त्यांनी सांगितली.
[…] मसुरे /प्रतिनिधी –मसुरे डांगमोडे येथे नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे यांच्यावतीने शुक्रवार दिनांक 29 मार्च रोजी रात्री ७ वाजता पासून नाईट अंडर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-खा-विनायक-राऊत-तिसर्यां/ […]