Kokan: मुंबईसह कोकणचे तापमान 37 ते 38 अंशापर्यंत वाढले

0
38
उष्णतेची महालाट
दोन दिवस उष्णतेची महालाट.; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

⭐पाऊस लांबण्याची शक्यता

रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्याला उन्हाचा तडाका बसला असून वातावरणात कमालीची वाढ झाली आहे. मुंबईसह कोकणचे तापमान 37 ते 38 अंशापर्यंत वाढले असून गेले 3 दिवस प्रचंड उष्मा जाणवत आहे. यंदा होळीच्या माडावर पावसाचे शिंपणे झाले नसल्याने यंदा पाऊस लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. http://रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्याला उन्हाचा तडाका बसला असून वातावरणात कमालीची वाढ झाली आहे. मुंबईसह कोकणचे तापमान 37 ते 38 अंशापर्यंत वाढले असून गेले 3 दिवस प्रचंड उष्मा जाणवत आहे. यंदा होळीच्या माडावर पावसाचे शिंपणे झाले नसल्याने यंदा पाऊस लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 4 ते 5 दिवस तापमानात आणखी वाढ होणार असून कोकणात दमट वातावरण राहणार आहे.किनारपट्टीवरील गावांतून मतलई वार्‍यांचा वेग कमी झाला असून सह्याद्रीच्या डोंगरदर्‍यांसह सडे तापले आहेत. मुंबईची आर्द्रता 47 टक्के पर्यंत पोहोचली आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक या शहरांचे तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. हवामान खात्याने एप्रिल महिन्यात काहीसा दिलासा मिळेल असे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here