‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना’ युवकांसाठी सुवर्णसंधी

0
57
‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना’ युवकांसाठी सुवर्णसंधी
‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना’ युवकांसाठी सुवर्णसंधी

‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना’ युवकांसाठी सुवर्णसंधी

 पात्रांनी त्वरित अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणारी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना ही योजना युवकांसाठी करिअर घडविण्याची मोठी संधी ठरत आहे. उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवून देणारी ही योजना देशभरातील तरुणांसाठी अत्यंत उपयुक्त मानली जात आहे.

या योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना देशातील नामांकित कंपन्यांमध्ये ६ ते ९ महिन्यांच्या कालावधीसाठी इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे युवकांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव, नवीन कौशल्ये आत्मसात करण्याची संधी तसेच व्यावसायिक नेटवर्क निर्माण करण्याची संधी मिळत आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्तांनी जिल्ह्यातील जास्तीत-जास्त इच्छुक व पात्र उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. या योजनेमुळे युवकांचा आत्मविश्वास वाढून व्यक्तिमत्व विकासालाही चालना मिळणार आहे.

सध्या या योजनेचा तिसरा टप्पा (Round 3) सुरू असून इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून विविध कंपन्यांमधील रिक्त पदांसाठी अर्ज करावेत, असे सांगण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग येथे प्रत्यक्ष भेट द्यावी किंवा ०२३६२-२२८८३५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here