डोंबिवलीजवळ रिकाम्या लोकलचा डबा घसरला; प्रवाशांना इजा नाही, वाहतुकीवर परिणाम
मुंबई : प्रतिनिधी
मध्य रेल्वे मार्गावर डोंबिवली स्थानकाजवळ आज सकाळी एक रिकाम्या लोकल गाडीचा डबा रुळावरून घसरल्याची घटना घडली. सकाळी ८.०९ वाजण्याच्या सुमारास कळवा कार शेडमधून कल्याणच्या दिशेने येत असलेल्या रिकाम्या रेकचा एक डबा घसरला असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.
या घटनेमुळे ‘अप’ दिशेकडील तीन लोकल गाड्यांची वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली. सुदैवाने ही गाडी रिकामी असल्याने कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम सुरू केले असून वाहतूक लवकरात लवकर सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.