MIDC भरती २०२३ : सुधारित निवड व प्रतीक्षा यादी जाहीर

0
51
MIDC भरती २०२३ : सुधारित निवड व प्रतीक्षा यादी जाहीर
MIDC भरती २०२३ : सुधारित निवड व प्रतीक्षा यादी जाहीर

MIDC भरती २०२३ : सुधारित निवड व प्रतीक्षा यादी जाहीर

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MIDC) अंतर्गत सरळसेवा भरती २०२३ संदर्भात सुधारित निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. विविध गट ‘ब’ आणि ‘क’ पदांसाठी ही यादी प्रसिद्ध करण्यात आली असून उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावरून तपशील पाहता येणार आहे.

या भरती प्रक्रियेत सहाय्यक अभियंता (सिव्हिल, इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल), सहाय्यक नियोजक, सहाय्यक वास्तुविशारद, लेखा अधिकारी, एरिया मॅनेजर यांसारख्या गट ‘ब’ पदांसह कनिष्ठ अभियंता, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहाय्यक, इलेक्ट्रिशियन, पंप ऑपरेटर, फिटर, ड्राफ्ट्समन, ट्रेसर, सर्व्हेयर आदी गट ‘क’ पदांचा समावेश आहे.

सुधारित निवड यादीबरोबरच प्रतीक्षा यादीही जाहीर करण्यात आल्याने अनेक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. संबंधित उमेदवारांनी आपल्या नावाची खातरजमा करून पुढील प्रक्रियेसाठी तयार राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here