BARC मध्ये ५६ संशोधन सहयोगी पदांची भरती
अर्जाची अंतिम मुदत २८ एप्रिल २०२६
मुंबई : प्रतिनिधी
भाभा अणु संशोधन केंद्र (BARC), ट्रॉम्बे, मुंबई यांनी संशोधन क्षेत्रातील उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध करून देत ५६ संशोधन सहयोगी (Research Associate) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी जाहिरात क्रमांक ३/२०२६ (R-V) प्रसिद्ध करण्यात आला आहे.
रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, पॉलिमर विज्ञान, अभियांत्रिकी, कृषी, जैवतंत्रज्ञान तसेच संबंधित शाखांतील संशोधन व विकास (R&D) प्रकल्पांसाठी RA-I, RA-II आणि RA-III या श्रेणींमध्ये फेलोशिपसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया फक्त ऑफलाइन पद्धतीने स्वीकारली जाणार असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २८ एप्रिल २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रता, विद्यावेतन (स्टायपेंड), निवड प्रक्रिया आणि अर्ज पद्धतीसंबंधी सविस्तर माहिती अधिकृत सूचनेत तपासावी.
संशोधन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी मानली जात असून, पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


