‘स्व. संतोष पवार स्मृती पत्रकारिता पुरस्कार २०२६’ सोहळ्याचे आयोजन
कर्जत तालुक्यातील पत्रकारांना भेदभावविरहित सन्मान देणारी पत्रकार संघटना, रायगड प्रेस क्लब आणि कर्जत प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्व. संतोष पवार स्मृती पत्रकारिता पुरस्कार २०२६’ सोहळ्याचे आयोजन झाले आहे.
स्व. संतोष पवार यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम २७ एप्रिल रोजी सायंकाळी ०५.३० वाजता नेरळ येथील मंडलिक सभागृहात (बडोदा बँक शेजारी) होणार आहे.
यावेळी स्व. धर्मानंद गायकवाड स्मृती तालुकास्तरीय पत्रकारिता पुरस्कार २०२६ युवा पत्रकार मोतीराम भिका पादीर यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या उत्कृष्ट पत्रकारितेचा गौरव होईल.
पत्रकार हा समाजाचा सजग प्रहरी असतो, जो सत्याची वस्तुनिष्ठ माहिती मांडतो, सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारतो, जनतेचा आवाज बनतो आणि सामाजिक मुद्द्यांवर प्रकाश टाकतो. प्रामाणिकपणा, निर्भीडता व सामाजिक बांधिलकी हीच त्याची खरी ओळख.
पुरस्कार हे उत्कृष्ट कार्याची अधिकृत पोचपावती असतात, ज्यामुळे इतरांना प्रेरणा मिळते आणि जबाबदार पत्रकारितेला चालना लागते.
सर्व मान्यवर, पत्रकार बांधव व नागरिकांनी परिवारासह उपस्थित राहून कार्यक्रम साजरा करावा, असे आयोजकांचे आवाहन आहे


