Maharashtra: एसओआयच्या छोट्या संगीतकारांनी ‘रिदम अँड मेलडीज – फ्रॉम बरोक टु पॉप’ मध्ये प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध!

0
63
‘रिदम अँड मेलडीज – फ्रॉम बरोक टु पॉप’ मध्ये प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध!
एसओआयच्या छोट्या संगीतकारांनी ‘रिदम अँड मेलडीज – फ्रॉम बरोक टु पॉप’ मध्ये प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध!

मुंबई : एसओआय म्युझिक अकॅडमीच्या छोट्या गायक- संगीतकारांनी मुसो या लहान मुलांसाठीच्या मुंबईतील म्युझियममध्ये आपल्या कलेचे दर्जेदार सादरीकरण केले. या ३१ गुणवान मुलांमध्ये १० वर्षाखालील १२ मुलांचाही समावेश होता. या मुलांनी अभिजात बाकपासून हॅरी पॉटरच्या हेडविग थीमपर्यंत विविध प्रकारचे सादरीकरण करत प्रेक्षकांची मने जिंकली. https://sindhudurgsamachar.in/kokan-दिशा-चौकेकर-हत्या-प्रकरण/

या कार्यक्रमासाठी प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. मुंबईच्या विविध भागांतून १७० जण या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. सांगीतिक क्षेत्रातील आपले सखोल ज्ञान दर्शवत या मुलांनी बरोकपासून पॉपपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे संगीत सादर केले.

या मुलांचे कौशल्य, त्यांचा ध्यास, अविरत प्रयत्नांतून तयार झालेल्या सादरणीकरणाने संपूर्ण मंच जणू सजीव झाला होता. पिढ्यानपिढ्या चालत आलेला संगीताचा वारसा समृद्धपणे जपत असल्याबद्दल प्रेक्षकांनी मुलांचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here