निकृष्ट कामांवर आमदार कारवाई करतील का? – मनसेचे कुणाल किनळेकरांचा सवाल

0
9
निकृष्ट कामांवर आमदार कारवाई करतील का? – मनसेचे कुणाल किनळेकरांचा सवाल
निकृष्ट कामांवर आमदार कारवाई करतील का? – मनसेचे कुणाल किनळेकरांचा सवाल

निकृष्ट कामांवर आमदार कारवाई करतील का? – मनसेचे कुणाल किनळेकरांचा सवाल

कुडाळ : कुडाळ येथे आमदार Nilesh Rane यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आमसभेबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) उपजिल्हाध्यक्ष Kunal Kinlekar यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अधिकाऱ्यांनी या सभेला गांभीर्याने न घेतल्याची टीका त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली.

किनळेकर म्हणाले की, आमसभा आयोजित करणे स्वागतार्ह असले तरी मतदारसंघातील विकासकामे आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा सखोल विभागीय आढावा घेणे अत्यावश्यक आहे. अधिकाऱ्यांची उदासीनता आणि कार्यकर्त्यांमार्फत होत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांवर आमदार कारवाई करतील का, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

त्यांनी पुढे नमूद केले की, पूर्वकल्पना असूनही अनेक विभागीय अधिकारी सभेला अनुपस्थित राहिले. त्यामुळे ही सभा खरोखरच यशस्वी ठरली का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्याची बीएसएनएलची स्थिती ‘लहरी राजा, प्रजा आंधळी’ अशा म्हणीसारखी असल्याची टीकाही त्यांनी केली. केंद्र सरकारकडून निधी मिळूनही सुविधा सुधारण्यात अपयश येत असल्याचे त्यांनी सांगितले.

कुडाळ व मालवण परिसरातील अनेक विकासकामे निकृष्ट दर्जाची असून काही प्रकल्प वर्षानुवर्षे रखडले आहेत, असेही किनळेकर यांनी नमूद केले. या कामांमागे बहुतांश ठेकेदार आमदार राणे किंवा त्यांच्या मित्रपक्षातील कार्यकर्त्यांशी संबंधित असल्याचा आरोप त्यांनी केला.

जनतेला त्रासमुक्त करण्यासाठी आमदार म्हणून निलेश राणे यांनी या प्रकरणांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी किनळेकर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here