मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबासह स्व-गणना करत जनगणना-२०२७ मोहिमेचा शुभारंभ
मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी मुंबई येथील Varsha Bungalow या शासकीय निवासस्थानी कुटुंबासह स्व-गणना करत Census of India 2027 मोहिमेचा शुभारंभ केला.
भारत सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या जनगणना-२०२७ मोहिमेला अशा प्रकारे प्रत्यक्ष सहभागातून प्रारंभ करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांनीही स्व-गणनेत सहभागी व्हावे, असा संदेश दिला.
यावेळी महाराष्ट्राच्या प्रधान जनगणना अधिकारी Dr. Nirupama J. Dange, तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) Dr. Vipin Sharma यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


