दापोली- ‘स्वीप’ मतदार जनजागृती अभियान अंतर्गत सध्या दापोली तालुक्यात विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद चंद्रनगर शाळेत नुकतीच ‘विद्यार्थ्याचे आईवडिलांस पत्र’ ही अभिनव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-खासगी-शाळांची-फी-१०-ते-१५/
पालकांना मतदानाबाबत जागृत करणे व त्यांचे प्रबोधन पत्रलेखनाच्या माध्यमातून करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे याशिवाय विद्यार्थ्यांनी ही पत्रे पालकांना वाचून दाखवून या पत्रासोबतचा एक सेल्फी फोटोही काढायचा आहे. चंद्रनगर शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी या पत्रलेखन स्पर्धेत सहभाग घेतला. या शाळास्तर स्पर्धेत वेदिका मुलूख हिने प्रथम क्रमांक, वैष्णवी आंबेलकर हिने द्वितीय क्रमांक, नीरजा वेदक हिने तृतीय क्रमांक तर इशांत पागडे याने चतुर्थ क्रमांक पटकावला. या पत्रलेखन स्पर्धेसाठी बाबू घाडीगांवकर व मनोज वेदक यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना सावंत व मानसी सावंत यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.