नडगिवे येथे पुन्हा अपघात; आठवड्यातील चौथा प्रकार, ४ जखमी

0
10
नडगिवे येथे पुन्हा अपघात; आठवड्यातील चौथा प्रकार, ४ जखमी
नडगिवे येथे पुन्हा अपघात; आठवड्यातील चौथा प्रकार, ४ जखमी

नडगिवे येथे पुन्हा अपघात; आठवड्यातील चौथा प्रकार, ४ जखमी

खारेपाटण (प्रतिनिधी) : Mumbai–Goa Highway वरील नडगिवे (ता. कणकवली) येथे अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून शुक्रवार, दि. १ मे २०२६ रोजी पुन्हा एकदा चारचाकी वाहन पलटी होऊन ४ जण जखमी झाल्याची घटना घडली. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यातील या ठिकाणचा हा सलग चौथा अपघात असल्याने प्रवासी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई परळ येथून चालक दीपक मधुकर दुधवडकर हे आपल्या कुटुंबीयांसह इको कार (MH 01-EN 4214) ने तळेरे खंडवाडी येथील मूळ गावी जात असताना खारेपाटणजवळील नडगिवे येथील धोकादायक वळणावर वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर कार पलटी होऊन सुमारे १५० मीटरपर्यंत फरफटत गेली.

या अपघातात वाहनातील ७ प्रवाशांपैकी ४ जण जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमींमध्ये अक्षता चंद्रशेखर दुधवडकर, पूजा दीपक दुधवडकर, शुभांगी रमेश पेडणेकर आणि चालक दीपक मधुकर दुधवडकर यांचा समावेश आहे.

अपघाताची माहिती मिळताच Maharashtra Police अंतर्गत खारेपाटण पोलिस ठाण्याचे अधिकारी मिलिंद देसाई व पोलीस कॉन्स्टेबल सुनील निकम यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने मदत केली. त्यांना खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून डॉ. सागर तरटे यांनी उपचार केले.

दरम्यान, नडगिवे परिसरातील तीन तीव्र वळणे अपघातप्रवण ‘हॉटस्पॉट’ ठरत असून नवीन महामार्ग सुरू झाल्यापासून येथे अनेक अपघात झाले आहेत. काहींना जीवही गमवावा लागला आहे. तरीही योग्य उपाययोजना न केल्यास भविष्यातील अपघातांसाठी संबंधित अधिकारी आणि महामार्ग प्राधिकरण जबाबदार राहील, असा इशारा संतप्त ग्रा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here