भारताचे महान धावपटू आणि ‘फ्लाइंग सिख’ या नावाने ओळखले जाणारे मिल्खा सिंग यांनी शुक्रवारी रात्री 11:24 वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांना कोरोनाची लागण झाली होती, आणि त्यांनी कोरोनावर यशस्वी मातही केली होती. कोरोनामुक्त झाल्यानंतर मिल्खा घरी परतले होते. मात्र प्रकृती बिघडल्याने त्यांना 3 जूनला पुन्हा रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यांच्या निधनाने देशात शोककळा पसरली आहे. देशातील विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली वाहिली.अलीकडेच काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीचेही निधन कोरोनामुळे झाले होते.
गुरुद्वारा साहिबपासून फुलांनी सजलेल्या वाहनामधून मिल्खा सिंह यांचे पार्थिव स्मशानभूमीत नेण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान केंद्रीय क्रिडा मंत्री किरण रिजिजू, पंजाबचे राज्यपाल व्हीपी सिंह बदनौर आणि हरियाणाचे क्रिडा मंत्री संदीप सिंह यांचीही उपस्थिती होती.
.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘आपण एक महान खेळाडू गमावला. काही दिवसांपूर्वीच त्यांच्याशी बोलणे झाले होते. हा शेवटचा संवाद असेल, असे वाटले नव्हते. ’मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी मिल्खा सिंहांचे पुत्र जीवी मिल्खा सिंह यांची भेट घेतली आणि म्हटले की, तुमचे पिता हे देशाची शान होते. कॅप्टन म्हणाले की, ते नेहमीच एक उत्साही व्यक्ती होते आणि आजच्या पीढीसाठी ते प्रेरणा देणारे होते.