गंगाराम सडवेलकर यांचे कार्य आदर्शवत – अतुल बंगे

0
46

गंगाराम सडवेलकर यांचे कार्य आदर्शवत – अतुल बंगे

पिंगुंळी केंद्रातील शाळा व विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी स्वखर्चाने शैक्षणिक उपक्रम राबवणारे जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांचे कार्य आदर्शवत आहे.

शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी त्यांचे कौतुक केले. पिंगुंळी मतदारसंघाला अशा आदर्श लोकप्रतिनिधीचा लाभ मिळाला, असे ते म्हणाले. पिंगुंळी केंद्र शाळेत गंगाराम सडवेलकर मित्र मंडळाने आयोजित कार्यक्रमात बंगे बोलत होते.

सडवेलकर पंचायत समिती सदस्यापासून जिल्हा परिषद सदस्यपर्यंत अविरत स्वखर्चाने विद्यार्थी, शिक्षक, पालक व शाळांसाठी उपक्रम राबवत आहेत, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात दीपप्रज्वलन झाले. रंगभरण, चित्रकला स्पर्धा, शिष्यवृत्ती सराव परीक्षा, आदर्श शाळा, व्यवस्थापन समिती, उपक्रमशील शिक्षक, विशेष विद्यार्थी पुरस्कार देण्यात आले. उपशिक्षणाधिकारी सविता परब व संदेश किंजवडेकर यांना बढतीबद्दल सडवेलकर यांच्या हस्ते शाल-श्रीफळ देऊन सन्मानित केले.

ग्रामपंचायत सदस्या गावडे, केंद्र मुख्याध्यापक गोविंद चव्हाण, नेरुर गोवेरी मुख्याध्यापिका सुरेखा प्रभुखानोलकर, कुडाळ हायस्कूल निवृत्त शिक्षक व्ही.के. परब, व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितीन कदम, लक्ष्मण आगलावे उपस्थित होते. सूत्रसंचालन राजा कविटकर यांचे; आभार लक्ष्मण गावडे यांचे. पालकांची मोठी उपस्थिती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here