कुडाळ तहसील कार्यालयात ८ मे रोजी महसूल शिबिर

0
42
कुडाळ तहसील कार्यालयात ८ मे रोजी महसूल शिबिर
कुडाळ तहसील कार्यालयात ८ मे रोजी महसूल शिबिर

कुडाळ तहसील कार्यालयात ८ मे रोजी महसूल शिबिर

विविध सेवांचा एकाच ठिकाणी लाभ

कुडाळ : Kudal Tehsil Office यांच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा-१)’ अंतर्गत शुक्रवार, ८ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता महसूल शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती तहसीलदार Sachin Patil यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार आयोजित या शिबिरात कुडाळ तालुक्यातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, महिला व शेतमजुरांना महसूल विभागाच्या १५ महत्त्वाच्या सेवांचा लाभ एकाच ठिकाणी मिळणार आहे.

शिबिरात ७/१२ व ८-अ उतारे, फेरफार दुरुस्ती, उत्पन्न, रहिवासी, जात व नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्रे, अकृषिक परवानगी, पीएम किसान व Agristack नोंदणी, आयुष्मान भारत कार्ड, रेशनकार्ड सुधारणा, घरपट्टे, विद्यार्थी दाखले, ई-मोजणी अर्ज आदी विविध कामे केली जाणार आहेत.

तहसीलदार सचिन पाटील यांनी नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here