रयत शिक्षण संस्थेच्या वतीने ०९ मे २०२६ रोजी कर्मवीर पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन.

0
47
रयत शिक्षण संस्थेच्या वतीने ०९ मे २०२६ रोजी कर्मवीर पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन.
रयत शिक्षण संस्थेच्या वतीने ०९ मे २०२६ रोजी कर्मवीर पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन.

रयत शिक्षण संस्थेच्या वतीने ०९ मे २०२६ रोजी कर्मवीर पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन.

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, आधुनिक शिक्षण भगीरथ पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा ६७ वा. पुण्यतिथी कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेच्यावतीने शनिवार दि. ०९ मे २०२६ रोजी स.०८.३० वा कर्मवीर समाधी परिसर, सातारा या ठिकाणी आयोजित केला आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष मा. खा. शरदचंद्रजी पवार साहेब उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. चंद्रकांत दळवी साहेब, ॲड. भगीरथ शिंदे साहेब, संस्थेचे संघटक मा. डॉ. अनिल पाटील साहेब, मॅनेजिंग कौन्सिलचे सर्व सन्माननीय सदस्य, जनरल बॉडी सदस्य, संस्थेचे लाईफ मेंबर, लाईफ वर्कर, संस्थेचे हितचिंतक, पदाधिकारी, सर्व शाखांचे शाखाप्रमुख यांच्या उपस्थितीत हा पुण्यतिथी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.

पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे औचित्य साधून रयत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक आणि भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी देणगी रूपाने विशेष योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार मा. खा. शरदरावजी पवारसाहेब यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे.

यामध्ये थोर देणगीदार मा. रामशेठ चांगू ठाकूरसाहेब, मा. सौ शकुंतला रामशेठ ठाकूर, मा. प्रतापराव गोविंदराव पवार, ॲड. अशोक बोरा, मे.पंचशील फौंडेशन, पुणे, फिनोलेक्स केबल लि., पिंपरी, बी. जी. शिर्के कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी प्रा. लिमिटेड या मान्यवरांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे.

त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाखांमध्ये गुणात्मक आणि संख्यात्मक विकास करून समाजाच्या विकासामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान देणा-या संस्थेच्या विविध शाखांना कर्मवीर पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर माध्यमिक आणि महाविद्यालय स्तरावर शैक्षणिक, सामाजिक, संशोधनात्मक क्षेत्रात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणा-या प्राध्यापक व शिक्षकांना ‘यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

याशिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करून रयत शिक्षण संस्थेचा लौकिक वाढविणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास शिक्षण प्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे सचिव मा. विकास देशमुख यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here