Kokan: वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम

0
44
मतदान जनजागृती,
वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम

वेंगुर्ला प्रतिनिधी-रत्नागिरी-सिधुदुर्ग लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार जनजागृती व मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रबोधनपर विविध उपक्रम राबविण्याबाबत जिल्हाधिका-यांच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे १० ते १९ एप्रिल या कालावधीत सेल्फि पॉईंट उपक्रम व मतदार हस्ताक्षर अभियान राबविण्यात आले. तर नगरपरिषद हद्दीतील सर्व प्रभागांमध्ये घंटागाडीद्वारे रोज मतदान जनजागृती करण्यात येत आहे. https://sindhudurgsamachar.in/देश-विदेश-डॉ-सीताराम-जिं/

वेंगुर्ला नं.१, वेंगुर्ला नं.२, वेंगुर्ला नं.३ या शाळांमध्ये तसेच वेंगुर्ला हायस्कूल, पवनपुत्र भाजी मंडई, सागररत्न मच्छी मार्केट, म्हाडा वसाहत, जुना एसटी स्टॅण्ड, अमृता कॅश्यू फॅक्टरी, वारंग काजू फॅक्टरी, कुबलवाडा दत्त मंदिर, आनंदवाडी येथे मतदार शपथ कार्यक्रम घेण्यात आला. शाळांमधील विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. बॅ.खर्डेकर महाविद्यालय, मार्केट, दाभोली नाका, जुना एसटी स्टॅण्ड, वेशी भटवाडी, पॉवर हाऊस, पिराचा दर्गा, एसटी स्टॅण्ड, बंदर, सातेरी मंदिर या ठिकाणी बॅनर उभारून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. पाटकर हायस्कूल व वेंगुर्ला हायस्कूल येथील विद्यार्थ्यांमार्फत २४ एप्रिल रोजी मानवी शृंखलेद्वारे मतदान करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. तसेच लोकशाही दिडी, पथनाट्य, वाळू शिल्प अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात येणार आहे.

 नगरपरिषदेतर्फे राबविण्यात येणा-या उपक्रमांमध्ये नागरिकांनी सहभागी होऊन ७ मे रोजी मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे.

फोटोओेळी – जुना एसटी स्टॅण्ड येथे मतदार शपथ कार्यक्रम घेऊन मतदान जनजागृती करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here