मडगाव – पनवेल साप्ताहिक विशेष ट्रेनचे बुकिंग सुरू
कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून, ट्रेन क्रमांक ०११०६ / ०११०५ मडगाव जंक्शन – पनवेल – मडगाव जंक्शन साप्ताहिक विशेष ट्रेनचे आरक्षण सुरू करण्यात आले आहे.
रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०११०६ मडगाव जंक्शन – पनवेल साप्ताहिक विशेष ट्रेनसाठी बुकिंग शुक्रवार, दि. ०९ मे २०२६ रोजी सकाळी ०८.०० वाजल्यापासून सुरू झाले आहे.
प्रवासी हे आरक्षण सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) केंद्रांवर, इंटरनेटद्वारे तसेच IRCTC अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
उन्हाळी हंगाम आणि वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेता ही विशेष ट्रेन सुरू करण्यात आल्याने गोवा, कोकण आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.


