श्री देव लिंगेश्वर मंदिराच्या वर्धापन दिनाचे १४ मे रोजी आयोजन

0
35
श्री देव लिंगेश्वर मंदिराच्या वर्धापन दिनाचे १४ मे रोजी आयोजन
श्री देव लिंगेश्वर मंदिराच्या वर्धापन दिनाचे १४ मे रोजी आयोजन

श्री देव लिंगेश्वर मंदिराच्या वर्धापन दिनाचे १४ मे रोजी आयोजन

श्री देव लिंगेश्वर मंदिर येथे बुधवार, दि. १४ मे २०२६ रोजी वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सत्यनारायण महापूजेद्वारे होणार असून, महिलांसाठी “खेळ पैठणीचा” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच श्रींची पालखी प्रदक्षिणा काढण्यात येणार असून रात्री पारंपरिक दशावतार नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे.

यावेळी दहावी, बारावी तसेच पदवी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान व सत्कार करण्यात येणार आहे.

या वर्धापन दिन सोहळ्यास सर्व भाविक, ग्रामस्थ तसेच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here