ठाणे-मुलुंडदरम्यान नवीन रेल्वे स्थानकाला मंजुरी

0
39
ठाणे-मुलुंडदरम्यान नवीन रेल्वे स्थानकाला मंजुरी
ठाणे-मुलुंडदरम्यान नवीन रेल्वे स्थानकाला मंजुरी

ठाणे-मुलुंडदरम्यान नवीन रेल्वे स्थानकाला मंजुरी

वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा

मुंबई महानगर प्रदेशातील वाढती रेल्वे गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ठाणे आणि मुलुंडदरम्यान नवीन रेल्वे स्थानक उभारण्याच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे या प्रस्तावास मान्यता दिली आहे.

या नव्या स्थानकामुळे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक अधिक सुसूत्र आणि वेगवान होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला. विशेषतः घोडबंदर रोड, पोखरण रोड आणि वागळे इस्टेट परिसरातील प्रवाशांना या स्थानकाचा मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here