Kokan: मतदार जागृतीसाठी दापोली पं. स. शि. विभागाचे वाकवली, गावतळे येथे पथनाट्य

0
55
मतदार जनजागृतीसाठी दापोली शिक्षण विभागाच्या कलापथकाचे पथनाट्य
तदार जागृतीसाठी दापोली पंचायत समिती शिक्षण विभागाचे वाकवली, गावतळे येथे पथनाट्य

दापोली- लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा व मतदार जनजागृती व्हावी यासाठी ‘स्वीप’ अंतर्गत पंचायत समिती दापोली शिक्षण विभागाच्या कलापथकाने दापोली तालुक्यातील वाकवली व गावतळे येथील बाजारपेठेत पथनाट्य सादर करून मतदार जनजागृती केली. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, दापोलीचे उपविभागीय अधिकारी अजित थोरबोले, तहसीलदार अर्चना बोंबे, नायब तहसीलदार अमित आडमुठे, गटविकास अधिकारी गणेश मंडलीक, ‘स्वीप’चे नोडल ऑफिसर अण्णासाहेब बळवंतराव, बळीराम राठोड यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून दापोली पंचायत समिती शिक्षण विभागाचे मतदार जागृती कलापथक स्थापन करण्यात आले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-चंद्रनगर-शाळेत-शाळापुर्/

या कलापथकात बाबू घाडीगांवकर, महेश गिम्हवणेकर, गणेश तांबिटकर, संजय मेहता, उदय गांधी, संतोष सकपाळ, शशिकांत बैकर, महेश शिंदे, सुनंदा मळगे, संजीवनी लाडे, वैजयंत देवघरकर, राहुल राठोड आदींचा समावेश असून दापोली तालुक्यात ठिकठिकाणी गर्दीच्या ठिकाणी जाऊन पोवाडा, गीतगायन व नाटीकांच्या माध्यमातून हे कलापथक दापोली तालुक्यातील मतदारांमध्ये जनजागृती करीत आहे. आतापर्यंत कांगवई, वेळवी, कादीवली, हर्णै, पाजपंढरी, आसूद, दाभोळ, मळे, उंबर्ले, वाकवली, गावतळे, दापोली बसस्थानक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बुरोंडी नाका या ठिकाणी या कलापथकाने मतदार जनजागृतीसाठीचे कार्यक्रम सादर केले आहेत. कलापथकाच्या पथनाट्य सादरीकरणाला ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून अनेकांनी या कलापथकातील सर्व सदस्यांचे कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here