हिमंत बिस्वा सरमा यांनी दुसऱ्यांदा घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
हिमंत बिस्वा सरमा यांनी आज सलग दुसऱ्यांदा आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यास अनेक मान्यवर उपस्थित होते.
आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी हिमंत बिस्वा सरमा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
शपथविधी सोहळ्यास उपस्थित मान्यवरांनी हिमंत बिस्वा सरमा यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि मुख्यमंत्रीपदाच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी आसाम राज्यातील त्यांचे सहकारी तसेच नवनियुक्त मंत्रीमंडळातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

