पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायद्यात सुधारणा आवश्यक – आमदार रोहित पवार 

0
40
जाचक अटी हटवल्याशिवाय आंदोलन मागे नाही; रोहित पवार यांचा इशारा
जाचक अटी हटवल्याशिवाय आंदोलन मागे नाही; रोहित पवार यांचा इशारा

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायद्यात सुधारणा आवश्यक – आमदार रोहित पवार 

मुंबई : NEET परीक्षेतील कथित पेपरफुटी घोटाळ्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून या प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत पोहोचल्याने महाराष्ट्राची मोठी बदनामी होत असल्याचे मत आमदार Rohit Pawar यांनी व्यक्त केले आहे.

देशभरातील सुमारे २४ लाख विद्यार्थ्यांना या घोटाळ्याचा फटका बसला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील २.२६ लाख विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

२०२३ मध्ये युवा संघर्ष यात्रेद्वारे पेपरफुटीविरोधात कठोर कायदा करण्याची मागणी करण्यात आली होती. केंद्र सरकारने Draft दिल्यानंतर राज्य सरकारने कायदा केला, मात्र त्या कायद्यात अनेक त्रुटी राहिल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला.

“त्या त्रुटी दूर करण्यासाठी मी विधानसभेत विधेयक देखील मांडले आहे, परंतु दुर्दैवाने त्यावर वेगाने कारवाई होत नाही,” असे त्यांनी म्हटले आहे.

येणाऱ्या अधिवेशनात या महत्त्वपूर्ण विधेयकावर तातडीने कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here