सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आखाड्यांना मोठा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीस यांची महत्त्वपूर्ण घोषणा

0
37

मुंबई : Nashik-Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela च्या तयारीसंदर्भात आयोजित आढावा बैठकीत Devendra Fadnavis यांनी आखाडे आणि धार्मिक संस्थांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. कुंभमेळ्याच्या माध्यमातून महाराष्ट्राला सेवा, व्यवस्थापन आणि अध्यात्माचा आदर्श निर्माण करण्याची मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत प्रत्येक आखाड्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. तसेच छोट्या धार्मिक संस्थांसाठी प्रत्येकी १५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. आखाड्यांच्या वीज बिलांची देयके प्राधिकरणामार्फत भरली जाणार असून, शासकीय कामासाठी आखाड्यांची जमीन अधिग्रहित झाल्यास संबंधित आखाड्यांना मोबदला किंवा पर्यायी जमीन देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

जगभरातून येणारे साधू, महंत आणि भाविक यांच्या सेवेसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देत कुंभमेळ्याचे भव्य आणि दिव्य आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीस Eknath Shinde, Ajit Pawar, Chhagan Bhujbal, Girish Mahajan, Dadaji Bhuse, Uday Samant आणि Shivendrasinhraje Bhosale यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here