राज्यात एसटीसाठी २०० ई-चार्जिंग स्टेशन उभारणार

0
9
राज्यात एसटीसाठी २०० ई-चार्जिंग स्टेशन उभारणार
राज्यात एसटीसाठी २०० ई-चार्जिंग स्टेशन उभारणार

राज्यात एसटीसाठी २०० ई-चार्जिंग स्टेशन उभारणार

२०३५ पर्यंत सर्व बसेस ई-बसेस करण्याचे लक्ष्य

मुंबई : एसटी महामंडळ (Maharashtra State Road Transport Corporation) राज्यभरात सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्त्वावर किमान २०० ई-चार्जिंग स्टेशन उभारणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी केली.

सन २०३५ पर्यंत एसटीच्या सर्व बसेस टप्प्याटप्प्याने ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यासाठी आवश्यक चार्जिंग पायाभूत सुविधा उभारण्यावर भर दिला जाणार आहे.

राज्यातील प्रवाशांना पर्यावरणपूरक, आधुनिक आणि कमी खर्चिक सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

पीपीपी तत्त्वावर उभारण्यात येणाऱ्या या चार्जिंग स्टेशनमुळे एसटी महामंडळाच्या ई-बसेसना मोठा आधार मिळणार असून, भविष्यात हरित ऊर्जेच्या वापराला चालना मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here