वेंगुर्ला तालुक्याचा बारावीचा निकाल ९८.८० टक्के

0
47
बारावी बोर्ड,माध्यमिक शाळा ,
बायोलॉजीचे विद्यार्थीही आता अभियांत्रिकीला पात्र ठरणार !

बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाची राजकुमारी हिंदुस्थानी बगळे तालुक्यात प्रथम.

वेंगुर्ला प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी – मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा वेंगुर्ले तालुक्याचा निकाल ९८.८०टक्के लागला.वेंगुर्ला तालुक्यात प्रथम येण्याचा मान बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाची विज्ञान शाखेची  राजकुमारी हिंदुस्थानी बगळे हिला मिळाला तर गोगटे ज्युनियर कॉलेज शिरोडा विद्यालयाची सानिका मोरजकर(९०.६७) द्वितीय तर बॅ बाळासाहेब  खर्डेकर महाविद्यालयाची सृष्टी मांजरेकर (९०.३३)तृतीय आली.तर सर्वाधिक शंभर टक्के निकाल तालुक्यात पाटकर हायस्कूल आणि  रा सी रेगे ज्युनियर कॉलेजचा लागला.

 वेंगुर्ला तालुक्यात पाटकर हायस्कूल-  रा सी रेगे ज्युनियर कॉलेज वेंगुर्लेचा शंभर टक्के निकाल लागला.तर बॅ खर्डेकर महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा, विज्ञान शाखेचा व व्यवसाय आभ्यासक्रम ,श्री देवी सातेरी हायस्कूल व कै.गुलाबताई दीनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा व स्वयंअर्थ सहाय्यीत विज्ञान शाखेचा,गोगटे ज्युनियर कॉलेज शिरोडा विद्यालयाच्या वाणिज्य व विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला.

वेंगुर्ले तालुक्यातील शाळा निहाय निकाल:-

श्री देवी सातेरी हायस्कूल व कै.गुलाबताई दीनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालय वेतोरेचा ९९.२१ टक्के निकाल लागला. परीक्षेला बसलेल्या १२८  विद्यार्थ्यांमधून १२७  विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या  महाविद्यालयात कला शाखेचा ९५ .२३ टक्के निकाल लागला.श्रेया परब (८२)चैताली राऊळ (६९)नेहा गावडे(६६.१७) ,वाणिज्य शाखेचा १०० टक्के निकाल लागला .या शाखेतून प्रांजली माडये (८५.३३)हर्षदा सामंत (७९)सुश्मिता राऊळ (७८.५०)तर स्वयंअर्थ सहाय्यीत विज्ञान शाखेचा शंभर टक्के निकाल लागला.या शाखेतून साक्षी चिटणीस (८४.१७)वैष्णवी धुरी (८३.६७)निशिता पडवळ (८०)

बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचा ९९.३०   टक्के निकाल लागला.या महाविद्यालयातून २८६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी २८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यालयाचा विज्ञान विभागाचा शंभर टक्के निकाल लागला.या शाखेत १३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.या शाखेतून राजकुमारी हिंदुस्थानी बगळे (९०.८३ )सृष्टी मांजरेकर (९०.३३)वेदिका परब (८८.५०).,कला शाखेचा ९६.०७  टक्के निकाल लागला या शाखेत ५१ पैकी ४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेतून दिव्या वेंगुर्लेकर (७२.८३)चैताली करंगुटकर (७१.८३)शंकर सारंग (७१.६७),,वाणिज्य विभागाचा शंभर टक्के निकाल लागला या विभागातून ६०  विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेतून करिष्मा तावडे (७१.८३)अर्चना परब (६९.८३)सुहानी कोंडुसकर व जनार्दन सावंत (६९),व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचा निकाल १०० टक्के लागला या विभागात ३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेतून मुस्कान सासाबाल (७९.५०) विद्या कदम (७४.८३)वसंत मातोंडकर (७४.३३)

पाटकर हायस्कूल आणि  रा सी रेगे ज्युनियर कॉलेज वेंगुर्लेचा परीक्षेला बसलेल्या ६१ सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होत १०० टक्के निकाल लागला.या विद्यालयातून कला शाखेतून सुजल गावडे (६२.१७ टक्के ) साहिल सावंत (६१ टक्के) देवेश परब (५८.१८ टक्के) वाणिज्य शाखेतून  अपूर्वा पेडणेकर (७०.६७ टक्के)कृपा खोबरेकर (६९.१७ टक्के)मयुरी आरोलकर ६८.८३ टक्के) व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचा १०० टक्के निकाल लागला.या शाखेतून अनंत पवार(८५.८३ टक्के) रिया डिचोलकर (७२टक्के)फॅलसी रॉड्रिक्स (७०.१७ टक्के)

गोगटे ज्युनियर कॉलेज शिरोडा विद्यालयाचा निकाल  ९७.८३ टक्के लागला. या विद्यालयातून परीक्षेला प्रविष्ठ २७६ विद्यार्थ्यांमधुन २७० विद्यार्थी उतीर्ण झाले.या विद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला. या  शाखेतून ११९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेत सानिका मोरजकर(९०.६७)हर्षाली मुळीक (८७.६७)सेजल भुबे (८७.५०)वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला.या शाखेतून ७३ ही विद्यार्थी उतीर्ण झाले.या विभागातून सानिका सावंत (९०.१७)हर्षिता शेंडेकर (७९.१७)रामचंद्र राऊत व फिरदोसजहाँ तैस (७८.१७)कला शाखेचा ९२.५९ टक्के निकाल लागला. या विभागातून २७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यामधून २५ विद्यार्थी उतीर्ण झाले. या शाखेतून राजश्री राळकर (८७.१७)निलाक्षी पेडणेकर(७६)वैभवी तांडेल (७२)व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचा ९२.९८ टक्के निकाल लागला. या शाखेतून ५७ पैकी ५३ विद्यार्थी उतीर्ण झाले. या शाखेत सावली तावडे (८५.८३)मैथिली जोशी (८१.६७)साक्षी रेडकर (८१.५०)

तालुक्यातील दहा मानकरी

राजकुमारी हिंदुस्थानी  बगळे (९०.८३ )  बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय

सानिका मोरजकर(९०.६७) गोगटे महाविद्यालय शिरोडा

सृष्टी मांजरेकर (९०.३३) बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय

सानिका सावंत (९०.१७) गोगटे ज्युनिअर कॉलेज शिरोडा

वेदिका परब (८८.५०) सातेरी हायस्कूल व गुलाबताई दीनानाथ नाईक महाविद्यालय

हर्षाली मुळीक (८७.६७)गोगटे ज्युनिअर कॉलेज शिरोडा

सेजल भुबे (८७.५०)गोगटे ज्युनिअर कॉलेज शिरोडा

राजश्री राळकर (८७.१७)गोगटे ज्युनिअर कॉलेज शिरोडा

सावली तावडे (८५.८३)गोगटे ज्युनिअर कॉलेज शिरोडा

प्रांजली माडये (८५.३३)सातेरी हायस्कूल व गुलाबताई दीनानाथ नाईक महाविद्यालय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here