Kokan: प्लॅस्टर ऑफ पॅरिस च्या गणेश मुर्ती बनविण्यास बंदी आणावी – अशोकराव जाधव

0
44
एस. टी बुकिंग
गौरी गणपती निमित्त सर्वोदय नगर खालचा गेट भांडुप वरून एस. टी बुकिंग चालू

⭐शेतकरी – कष्टकरी संघटनेची जिल्हा अधिकारी यांचेकडे कायदेशीर मागणी –

रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यात शाडूच्या मातीच्या आणि लालपातीचे गणपती मुर्ती कारखाने सुमारे 1500 ( एक हजार पाचशे ) असुन 70 ते 80 कारागिर पुर्ण जिल्हात प्लॅस्टर ऑफ पॅरिस च्या मुर्ती तयार करतात आणि बहुतांशी प्लॅस्टर ऑफ पॅरिस च्या मुर्ती पनवेल व अन्य शहरातून येतात. पण या मुर्ती विसर्जना वेळी आणि त्यानंतर कधीही पाण्यात विरघळून जात नाहीत ऊलट तशाच अगदी रंगा सहीत राहतात या मुळे पर्यावरणाची हानी तर होतेच पण देव गणेशाची विटंबना ही होते आणि स्वःताला धार्मिक म्हणवून घेणाऱ्यांना त्या बद्दल थोडीही काळजी , चिंता वाटत नाही . इतकेच नाही जे कलाकार हाथी मातिची मुर्ती घडवतात त्यांच्या कलेचा ही अपमान होतोच पण कलाही लोप पावते या साठी प्लॅस्टर ऑफ पॅरिस च्या मुर्ती करू नये असा महाराष्ट्र शासनाचा कायदा आहेच आणि मुंबई हायकोर्टाने जर कोणी प्लॅस्टर ऑफ पॅरिस च्या मुर्ती करत असेल तर त्यावर कडक कारवाई करावी असे आदेश दिले आहेत . आणि या साठी गेल्या वर्षी जिल्हा अधिकारी यांना तीन निवेदणे देवून वेळो वेळी चर्चा करूनही दुर्लक्ष केले त्यामुळे जिल्हातील सर्व मुर्तीकार यांचे वतीने आज निवासी जिल्हा अधिकारी श्री सुर्यवंशी यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली असता या वर कारवाई करण्याचे आश्वासन दिले . https://sindhudurgsamachar.in/देश-विदेश-ग्रामीण-भारताच/

या मुळे जिल्हातील सुमारे 1400 मुर्तीकार अशोकराव जाधव यांच्या पाठीशी ठाम उभे असलेचे विश्वनाथ किल्लेदार यानी सांगितले . जर या बाबतीत शासनाने हयगय केली तर अंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here