सावंतवाडी बाजारपेठेत हापूसला मागणी घट

0
31
जपानने भारतीय आंब्यांच्या सहा जातींवर घातली बंदी; हापूस निर्यातीला मोठा फटका
जपानने भारतीय आंब्यांच्या सहा जातींवर घातली बंदी; हापूस निर्यातीला मोठा फटका

सावंतवाडी बाजारपेठेत हापूसला मागणी घट

दर कमी असूनही ग्राहकांची पाठ

सावंतवाडी :
सावंतवाडी (Sawantwadi ) बाजारपेठेत हापूस आंब्याचे दर घसरून प्रतिडझन सुमारे ₹१२० पर्यंत आले असतानाही ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे आंबा विक्रेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हवामानातील सतत होणारे बदल, अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे ग्राहकांची हापूस आंब्यावरील मागणी मोठ्या प्रमाणात घटल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दर कमी असूनही बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी कमी दिसून येत आहे.

यंदाच्या हंगामात उत्पादनावरही हवामानाचा परिणाम झाला असून विक्री मंदावल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोकणातील प्रसिद्ध हापूस आंब्याला दरवर्षी मोठी मागणी असते, मात्र यंदा परिस्थिती काहीशी वेगळी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here