देश-विदेश: भारतीय वंशाचे अमेरिकी शास्त्रज्ञ श्रीनिवास आर. कुलकर्णी खगोलशास्त्रातील २०२४ साठीच्या प्रतिष्ठित शॉ प्राइझने सन्मानित

0
40
खगोलशास्त्र,अमेरिकी शास्त्रज्ञ ,
श्रीनिवास आर. कुलकर्णी, भारतीय वंशाचे अमेरिकी शास्त्रज्ञ आणि सुधा मूर्ती यांचे भाऊ खगोलशास्त्रातील २०२४ साठीच्या प्रतिष्ठित शॉ प्राइझने सन्मानित

राष्ट्रीय, २३ मे  –

कुलकर्णी, कॅलटेकमध्ये खगोलशास्त्र व ग्रह विज्ञानातील जॉर्ज एलेरी हेल प्रोफेसर म्हणून काम करत असून त्यांना २०२४ साठी खगोलशास्त्रातील शॉ प्राइजने सन्मानित करण्यात आले. मिलिसेकंद पल्सर, गॅमारे स्फोट, सुपरनोव्हा आणि इतर तात्कालिक खगोलीय घटनांविषयी त्यांनी केलेल्या क्रांतीकारी संशोधनाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्काराच्या मानपत्रामध्ये पुढे असे म्हटले आहे की कुलकर्णी यांचे ‘टाइमडोमेन खगोलशास्त्रातील पालोमर ट्रान्सियंट फॅक्टरी (PTF) तसेच त्याचा उत्तराधिकारी झ्विकी ट्रान्सियंट फॅसिलिटीची (झेडटीएफ) संकल्पना, उभारणी आणि नेतृत्वासाठी दिलेल्या योगदानातून आमच्या टाइम- व्हेरियबल ऑप्टिकल आकाशाबद्दलच्या आकलनात क्रांती आली आहे. त्यांच्या असंख्य कामगिरीमध्ये २००६ ते २०१८ या कालावधीत कॅल्टेक ऑप्टिकल ऑब्झर्व्हेटरीजचे संचालक पद भूषवण्याचा समावेश आहे. कुलकर्णी यांनी टाइम- डोमेन खगोलशास्त्रात पालोमर ट्रान्सियंट फॅक्टरी (PTF) आणि झ्विकी ट्रान्सियंट फॅसिलिटीच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण काम केले आहे. या कामामुळे डायनॅमिक आकाशाविषयीचे आकलन उंचावण्यास मदत झाली आहे. द शॉ प्राइज फाउंडेशनने म्हटले आहे, की ‘श्रीनिवास आर. कुलकर्णी यांनी मिलिसेकंद पल्सर, गॅमा-रे स्फोट, सुपरनोव्हा आणि इतर तात्कालिक खगोलीय घटनांविषयी त्यांनी केलेल्या क्रांतीकारी संशोधनाबद्दल द शॉ प्राइज हा पुरस्कार देण्यात आला आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-ड्रीम-११-कप-१४-वर्षाखा-4/

हे या पुरस्कारांचे २१ वे वर्ष आहे. रन रन शॉ शिक्षण, वैज्ञानिक संशोधन, आरोग्यसेवा आणि कला क्षेत्रातील परोपकारी कामांसाठी प्रसिद्ध असून त्यांनी स्थापन केलेले शॉ प्राइज ‘पूर्वेचे नोबेल’ म्हणून ओळखले जाते. शॉ फाउंडेशन हाँगकाँग आणि सर रन रन शॉ चॅरिटेबल ट्रस्ट या क्षेत्रांसाठी सातत्याने योगदान देत असतात.

कुलकर्णी यांनी आपल्या करियरमध्ये असंख्य उल्लेखनीय कामगिरी केल्या आहेत. कॅलटेकच्या संकेतस्थळावरील त्यांच्या आत्मचरित्रानुसार कुलकर्णी यांनी १९७८ मध्ये इंडियन इन्स्ट्टियूट ऑफ टेक्नोलॉजीमधून मास्टर ऑफ सायन्सची पदवी मिळवली आणि १९८३ मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामधून पीएचडी केली. त्यांनी २००६ ते २०१८ दरम्यान कॅलटेक ऑप्टिकल ऑब्झर्व्हेटरीजचे नेतृत्व करत निरीक्षणात्मक खगोलशास्त्र क्षेत्रात आधुनिक बदल घडवून आणले. कुलकर्णी यांना विविध पुरस्कार मिळाले असून त्यात नॅशनल सायन्स फाउंडेशनचा अ‍ॅलन टी. वॉटरमन पुरस्कार आणि डॅन डेव्हिड पुरस्कार यांचा समावेश आहे. त्यांनी वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत नेचर जर्नलमध्ये ६० पेक्षा जास्त पेपर्सचे सह- लेखन केले आहे.

कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पालोमर ट्रान्सियंटर फॅक्टरीने खगोलशास्त्रात विविध शोध लावले आहेत. झ्विकी ट्रान्सियंट फॅसिलिटीने त्यांचे काम सुरू ठेवत खगोलशास्त्रज्ञांना अभ्यास करण्यास तात्कालिक वैश्विक घटना समजून घेण्यास मदत केली जाते. या प्रकल्पांनी शास्त्रज्ञांना अल्पकाळ टिकणाऱ्या खगोलशास्त्रीय घटनांचे निरीक्षण व विश्लेषण करण्यासाठी मदत करत विश्वाबद्दलचे ज्ञान विस्तारले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here