Maharashtra: विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर

0
34
विधान परिषद,
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर

मुंबई- लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीतच जाहीर करण्यात आलेली विधान परिषद निवडणूक शिक्षक निवडणूक ड्युटीवर असल्याचे कारण देत पुढे ढकलण्यात आली होती. या चार मतदारसंघांतील निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-आशिये-वरचीवाडी-येथील-संद/

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर, तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी निवडणूक १० जूनरोजी जाहीर करण्यात आली होती. परंतु ती दहा दिवसांपूर्वीच पुढे ढकलण्यात आली होती. शाळांमधील उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर ही निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. आयोगाने या संदर्भात विचारविमर्श करून महाराष्ट्र विधान परिषदेच्या उक्त द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम नंतरच्या तारखेपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता.

विधानपरिषदेत मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे उद्धवसेनेचे विलास पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे निरंजन डावखरे, मुंबई शिक्षकचे कपिल पाटील व नाशिक शिक्षकचे किशोर दराडे यांची सदस्यत्वाची मुदत ७ जुलै २०२४ रोजी संपत आहे. त्यामुळे या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा महायुती आणि महाविकास आघाडी आमने-सामने येणार आहेत.

▪️पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम
31 मे 7 जून पर्यंत अर्ज भरले जाणार
10 जून रोजी अर्जाची छाननी केली जाणार
12 जूनपर्यंत अर्ज माघारी घेता येणार
26 जून रोजी मतदान प्रक्रिया होणार
1 जुलै रोजी होणार मतमोजणी होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here