सीबीएसई करणार 12 लाख पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना पास!

0
96

 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSE च्या बारावीच्या परीक्षांचे निकाल नव्या फॉर्मुल्याअनुसार परीक्षा न घेताच लागणार आहेत.यासंबंधीचे नवीन डॉक्यूमेंट CBSE ने जारी केले आहेत.यासाठी एक समिती स्थापित केली जाणार आहे. या समितीमध्ये दोन वरिष्ठ शिक्षक, दोन जवळच्या शाळांचे शिक्षक देखील असतील. मूल्यमापनाच्या वेळी विषयांचे शिक्षक सुद्धा समितीमध्ये असतील. यामध्ये एका आयटी एक्सपर्ट शिक्षकाचा देखील समावेश राहणार आहे. सीबीएसई सुद्धा शाळांना तांत्रिक मदत करणार आहेत.

एखाद्या शाळेने जर या समितीने घातलेल्या गाइ़डलाइनचे पालन केलेच नाही असे निदर्शनास आल्यास त्या शाळेवर कारवाई होईल. सीबीएसई बोर्डाकडून अशा शाळेची मान्यता रद्द केली जाईल शिवाय शाळेला आर्थिक दंड लावला जाऊ शकेल. सद्यस्थितीला तरी शाळांनी अपलोड केलेले निकाल हेच वैध मानले जाणार आहेत
नवीन फॉर्मुल्यानुसार एखादा विद्यार्थी नापास झाला असेल तर अशा विद्यार्थ्यांना इंसेन्‍शल रिपीट किंवा कम्पार्टमेंट श्रेणीत ठेवले जाईल. ते परीक्षा देऊ शकतील. तसेच जे विद्यार्थी या वर्षी काही कारणास्तव असेसमेंटमध्ये सहभागी होऊ शकले नाही त्यांची तोंडी परीक्षा घेतली जाईल. त्यावरून मूल्यमापन केले जाईल.परदेशी विद्यापीठांमध्ये होणारे प्रवेश बारावीच्या मार्कांच्या आधारे होत नाहीत. परदेशात अकरावीचे मार्कच बारावीतील भावी मार्क म्हणून पाठवले जातात. काही शाळांमध्ये उच्च माध्यमिक विभागात 5 पेक्षा अधिक विषय शिकवले जातात, अशा विध्यार्थ्यांना ज्या 3 विषयांमध्ये सर्वाधिक गुण असतील, ते मोजले जाणार आहेत. यातील एखाद्या विषयांचा पूर्णांक 80 पेक्षा अधिक असला तरी 80 पूर्णांकाच्या हिशेबानेच मार्क मोजले जाइल. CBSE च्या परवानगीने विषय बदलले असतील तर 3 विषयांच्या गुणांच्या आधारे मूल्यमापन केले जाईल.

बारावीच्या परीक्षेनंतर पुढील प्रवेशांसाठी एक-एक मार्क महत्वाचा असतो. अशा गुणांच्या मोजणीने बारावीत कुणीही नापास होणार नाही. त्यामुळे, बहुतांश महाविद्यालय आणि विद्यापीठ प्रवेशासाठी परीक्षा आयोजित करतील. दरवर्षी सरासरी 85% विद्यार्थी उत्तीर्ण होऊन उच्च प्रवेश घेतात. यावेळी त्यांची संख्या 15% अधिक राहील. त्यामुळे सरकारला उच्च शिक्षणातील जागा वाढवाव्या लागतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here