गोकुळ डेअरीकडून गाईच्या दुधाच्या दरात प्रति लिटर ₹२ वाढ

0
35
गोकुळ डेअरीकडून गाईच्या दुधाच्या दरात प्रति लिटर ₹२ वाढ
गोकुळ डेअरीकडून गाईच्या दुधाच्या दरात प्रति लिटर ₹२ वाढ
गोकुळ डेअरीकडून गाईच्या दुधाच्या दरात प्रति लिटर ₹२ वाढ
गोकुळ डेअरी (Gokul Dairy) ने गाईच्या दुधाच्या विक्री दरात प्रति लिटर ₹२ ची वाढ जाहीर केली आहे. ही नवीन दरवाढ २१ मे २०२६ पासून लागू होणार असून कोल्हापूर, पुणे, मुंबई आणि कोकण विभागातील सर्व शहरांमध्ये ती प्रभावी राहणार आहे.
शिरगाव येथील गोकुळ डेअरीच्या मुख्य कार्यालयात शनिवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नुकत्याच नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकीय मंडळाच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दरवाढ फक्त गाईच्या दुधाच्या विविध प्रकारांसाठी लागू करण्यात आली आहे. यात गायीचे दूध, टोन्ड दूध, शक्ती दूध आणि स्टँडर्ड दूध यांचा समावेश आहे. मात्र, म्हशीच्या दुधाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
गोकुळ प्रशासनाने सांगितले की, वाढते इंधन दर, कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमती तसेच वाहतूक आणि पॅकेजिंग खर्चातील वाढ यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या दरवाढीमुळे ग्राहकांच्या दैनंदिन खर्चात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here