पुण्यात पीपीपी तत्त्वावरील देशातील पहिल्या कर्करोग रुग्णालयाचे उद्घाटन
पुण्यात पीपीपी तत्त्वावरील देशातील पहिल्या कर्करोग रुग्णालयाचे उद्घाटन
पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) आणि “आपुलकी हेल्थ केअर”(Apulki Health Care ) यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या पीपीपी तत्त्वावरील देशातील पहिल्या कर्करोग रुग्णालयाचे उद्घाटन माननीय मुख्यमंत्री Devendra Fadnavis आणि DCM SUnetra Pawarयांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शासन आणि खाजगी संस्था एकत्र आल्यास सर्वसामान्य नागरिकांना जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा अत्यंत माफक दरात उपलब्ध करून देता येतात, असे सांगितले. ‘आपुलकी’ हे केवळ नाव नसून, रुग्णसेवेमध्ये माणुसकीचा ओलावा, संवेदनशीलता आणि विश्वास असावा, ही भावना या उपक्रमामागे असल्याचे त्यांनी नमूद केले.
आरोग्यसेवेमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम या उपक्रमातून दिसून येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
याच पार्श्वभूमीवर नुकतेच पुणे जिल्ह्यातील ४५ मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्रांचे (PHC) उद्घाटन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या उपक्रमामुळे शहरासह ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक आधुनिक, सक्षम आणि बळकट होण्यास मदत होणार आहे.
गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत अधिक सुलभपणे पोहोचाव्यात, हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करत नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार आणि दैनंदिन व्यायाम यावर भर देण्याची गरज व्यक्त केली.
राज्य शासन नागरिकांना अधिक सक्षम, सुलभ आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून, अशा उपक्रमांमुळे आरोग्य क्षेत्रात नवा आदर्श निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.